Publish Date: Fri, 21 Aug 2015 (12:21 IST)
Updated Date: Fri, 21 Aug 2015 (12:26 IST)
रिलीज अगोदर बॉलीवूडचा किंग खानचे चित्रपट दिलवाले ने रिलीज होण्या अगोदरच 230 कोटी रुपयांची कमाई केली आहे. फिल्म दिलवाले चे इंडियन डिस्ट्रिब्यूशन राइट्स 130 कोटींमध्ये विकण्यात आले. परदेशात डिस्ट्रीब्यूशन राइट्स 40 कोटीत विकल्या गेले. 170 कोटीचा बिझनेसतर रिलीज अगोदरच दिलवालेने करून घेतला आहे.
सोनी म्यूझिकला गाण्याचे राइट्स 15 कोटीत विकण्यात आले. सॅटेलाईट आणि टीव्ही राइट्ससाठी गोष्टी सुरू असून वृत्त असे आले आहे की 45 कोटीची डील निश्चित होईल. आणि जर दिलवाले ने बॉक्स ऑफिस वर 250 कोटीपेक्षा जास्त कमावले तर सॅटेलाईट आणि टीव्ही राइट्स अजून महाग होतील.