Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिव्या दत्ताने कंगनाला सुनावले!

divya datta
दिव्या दत्ताने मीच भारताची एक नंबरची अभिनेत्री आहे बाकीच्या अभिनेत्रींची वाढ खुंटली असल्याचे स्फोटक विधान केल्यामुळे चर्चेत असलेल्या कंगना राणावतला चांगलेच सुनावले असून इतर अभिनेत्रींबद्दल आदर ठेवण्याऐवजी कंगना उर्मट बोलत असल्याचे दिव्याचे म्हणणे आहे.

बी ग्रेडच्या चित्रपटांपासून मी कारकिर्द सुरू केली आणि आज मी भारतातील एक नंबरची अभिनेत्री आहे. माझ्या समकालीन अभिनेत्रींची वाढ खुंटली असल्याचे कंगनाने म्हटले होते.

कंगनाच्या या बोलण्याचा समाचार घेताना दिव्या म्हणते, कंगना खरेच असे बोलली का हे फिल्मफेअर मॅगझीनने स्पष्ट करावे. प्रत्येकाला एक संधी योग्य वेळी मिळते. आपल्या आजूबाजूला अनेक टॅलेंटेड लोक असतात त्यांचा आदर केला पाहिजे. दिव्याने तिचे हे म्हणणे ट्विटरवर मांडले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi