Publish Date: Mon, 20 Jul 2015 (09:21 IST)
Updated Date: Mon, 20 Jul 2015 (09:24 IST)
कॅटरिना आणि आमिर खानच्या धूम तीनने बॉक्स ऑफिसवर चांगलाच व्यवसाय केल्यानंतर आता धूमचा सिक्वेल धूम चार येणार हे नक्की झाले आहे. या चित्रपटात कोणती जोडी असेल याचे अंदाजही व्यक्त होऊ लागले असून त्यात धूम चारमध्ये हृतिक आणि दीपिका पदुकोण ही जोडी जमेल असे सांगितले जात आहे. अर्थात या संदर्भात निर्माता विजय कृष्ण आचार्य याने कोणतेही भाष्य केलेले नाही.
हृतिक आणि दीपिका यांनी अद्यापी एकत्र काम केलेले नाही. हृतिकचा बँगबँग आणि दीपिकाचा पीकू ब्लॉकब्लस्टर ठरले आहेत. त्यामुळे धूम चारसाठी ही जोडी निश्चित केली गेल्याचे अंतर्गत सूत्रांकडून समजते. मात्र धूम सिक्वेलमध्ये अद्यापपर्यंत लीड स्टार रिपीट केला गेलेला नाही. धूममध्ये जॉन अब्राहम, धूम टू मध्ये हृतिक, धूम थ्री मध्ये आमिर झळकले आहेत. त्यामुळे धूम चारमध्ये हृतिकला रिपीट केले जाईल का अशीही शंका व्यक्त केली जात आहे.