Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नव्या आणि आराध्यासाठी लिहिले अमिताभ बच्चन यांनी पत्र

नव्या आणि आराध्यासाठी लिहिले अमिताभ बच्चन यांनी पत्र
नवी दिल्ली , मंगळवार, 6 सप्टेंबर 2016 (14:57 IST)
अमिताभ बच्चन यांनी आपली नाथ नव्या नवेली नंदा आणि आराध्यासाठी एक पत्र लिहिले आहे, जे प्रत्येक महिलेने नक्की वाचायला पाहिजे. या पत्रात अमिताभाने दोघींना आपल्या हक्कासाठी लढणे आणि मोकळ्या मनाने पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे.  
 
अमिताभ यांनी या पत्रात लिहिले आहे की, 'तुमच्या दोघींच्या नाजुक खांद्यावर फारच महत्त्वाच्या वारसाची जबाबदारी आहे. आराध्या, आपले पंजोबा डॉ. हरिवंश राय बच्चन आणि नव्या आपले पंजोबा श्री एच.पी. नंदा यांची वारस सांभाळत आहे. तुमच्या दोघींचे पंजोबांनी तुम्हाला हे आडनाव दिले आहे, ज्याने तुम्ही ही प्रतिष्ठा, उपाधी आणि सन्मानाला सेलिब्रेट करू शकाल.  
 
तुम्ही दोघी भले नंदा किंवा बच्चन असाल पण तुम्ही दोघी मुली आणि महिला आहात आणि तुम्ही स्त्रिया असल्यामुळे लोक त्यांचे विचार,  त्यांची पोहोच तुमच्यावर थोपण्याचा प्रयत्न करतील. ते तुम्हाला सांगतील की तुम्ही कसे कपडे परिधान केले पाहिजे, कसा व्यवहार करायला हवा, कोणाला भेटायला पाहिजे आणि कुठे जायला पाहिजे. आपल्या स्वविवेकावर आपले निर्णय स्वत: घ्या. कोणाला हे निश्चित करण्याचा हक्क नाही आहे की तुमच्या स्कर्टची लांबी तुमच्या चारित्र्याचा मापदंड असेल. कोणाला हा सल्ला देण्याचा परवानगी देऊ नका की तुमचे मित्र कोण असावे आणि तुम्हाला कोणाशी मैत्री ठेवायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही लग्नासाठी तयार नसाल तोपर्यंत कोणाच्या दाबाव्यात येऊन लग्न करू नका. लोक बोलतील. ते बर्‍याच वेळा बेकारच्या गोष्टीदेखील करतील, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला प्रत्येकाचे ऐकायला पाहिजे. कधीही या गोष्टीने अस्वस्थ होऊ नका की लोक काय म्हणतील.  
 
शेवटी तुम्ही दोघीच असा असाल ज्यांना आपल्या कुठल्याही कामाचा परिणाम भोगावा लागणार आहे, म्हणून दुसर्‍याला तुमच्याबद्दल निर्णय घेण्याचा हक्क देऊ नका. नव्या- तुझे नाव, तुझ्या आडनावाचे वैशिष्ट्य तुम्हाला त्या अडचणींपासून बचाव करणार नाही, ज्या महिला असल्यामुळे तुमच्या वाटे येतील. आराध्या- वेळेप्रमाणे तू देखील या गोष्टी चांगल्या प्रकारे समजशील. असे ही असू शकत की त्या वेळेस मी तुमच्या जवळ कदाचित नसणार. पण मला असे वाटते की जे काही मी आज तुम्हाला सांगत आहोत त्या वेळेस देखील तुमच्यासाठी ते योग्यच ठरणार आहे.  
 
हे फारच अवघड असू शकत की, एका महिलेसाठी हे जग फारच त्रासदायक असू शकत, पण माझा विश्वास आहे की तुमच्या सारख्या महिला या वस्तूपरिस्थितीला बदलू शकता. आपली सीमा, आपली आवड ठेवणे, दुसर्‍यांच्या निर्णयावर न विचार करता स्वत: आपले निर्णय घ्याल भले ते सोपे नसतील, पण तुम्ही...  तुम्ही प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी एक उदाहरण बनू शकता. असच करा आणि जेवढे आजपर्यंत मी केले आहे त्यापेक्षा अधिक चांगले कराल आणि माझ्यासाठी सन्मानाची बाब असेल की मी अमिताभ बच्चनच्या नावाने नव्हेतर तुमच्या आजोबांच्या नावाने ओळखण्यात येऊ'. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उपचारासाठी माधुरी दीक्षित अमेरिकेला रवाना