Publish Date: Wed, 21 Oct 2015 (13:19 IST)
Updated Date: Wed, 21 Oct 2015 (13:28 IST)
हॅरी पॉटर या गाजलेल्या सिनेमाच्या पाचही भागांत पद्मा पाटील ही भूमिका सारकणारी अभिनेत्री अफसाना आझाद सध्या बरीच चर्चेत आहे. सिनेमातील ही लहानगी मुलगी आता मोठी झाली असून ट्विटरवरील तिची सुंदर छायाचित्रे चर्चेचा विषय झाले आहे. सोशल मीडियावरून अफसानाची छायाचित्रे सर्वत्र फिरत आहे. अफसानाचे सध्याचे सुंदर रूप पाहून अनेकजण आचंबित होत असेल, तरी अफसानाला यात फार काही विशेष वाटत नाही. आपल्यामध्ये आमुलाग्र बदल वगैरे झाला नसून, आपण केवळ मोठे झालो असल्याचे तिचे म्हणणे आहे.