Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 16 February 2025
webdunia

पल्लवी शारदा आता हॉलिवूडमध्ये

पल्लवी शारदा आता हॉलिवूडमध्ये
, शनिवार, 28 मे 2016 (13:08 IST)
आयपीएलच्या ‘एक्स्ट्रा इनिंग्ज टी 20’ची अँकर पल्लवी शारदा यंदा चांगलीच चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियन नागरिक असलेली भारतीय वंशाची पल्लवी आता हॉलिवूडमध्येही दिसणार आहे. हॉलिवूडमध्ये लहानसहान नाही तर चक्क देव पटेल, निकोल किडमन आणि रुनी मारा यांची भूमिका असलेल्या ‘लायन’ या सिनेमात पल्लवी चमकणार आहे. पल्लवीचे आईवडिल भारतीय असून ऑस्ट्रेलियातील नामवंत अभ्यासक आहेत.

वडील नलीनकांत शारदा व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आहेत, तर आई हेमा युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियात प्राध्यापक आहे. स्वत: पल्लवी ही उच्चविद्याविभूषित आहे. लॉ, मास कम्युनिकेशनमध्ये पदवी आणि आधुनिक भाषांत डिप्लोमा केला आहे. मिस इंडिया ऑस्ट्रेलिया 2010 ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिचे मॉडेलिंग आणि सिनेमातील करिअर सुरू झाले. शाहरूखच्या ‘माय नेम इज खान’मध्ये तिची लहान भूमिका होती. मनोज वाजपेयीचा दस तोला यात तिची मुख्य भूमिका होती. याशिवाय एक इंडो अमेरिकन सिनेमा वॉअवेमध्येही तिने काम केले आहे. तसेच ऑस्ट्रेलियन सिनेमा ‘सेव्ह युअर लेग्ज’मध्ये तिची भूमिका होती. ‘सेव्ह युअर लेग्ज’मध्ये तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. हिरोईन, लव्ह ब्रेकअप जिंदगी या सिनेमातूनही तिने भूमिका केल्या आहेत. यंदाच्या आपीएलमध्ये तिची वर्णी लागली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘उडता पंजाब’ सेन्सॉर बोर्डच्या कात्रीत