Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानची पहिली आयटम गर्ल

pakistani actress
पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयात सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘जिंदगी’ चॅनलवरील ‘कभी कभी’सीरियलमध्ये महविश झळकली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी सिनेमातील पहिले आयटम साँग हे महविश हयातवर चित्रित करण्यात आले होते. ‘ना मालूम अफराद’ या सिनेमातील आयटम साँगमध्ये महविश थिरकली आहे. महविशच्या या आयटम साँगचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होताच तो व्हायरल झाला आहे.
 
भारतीय प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. भारतीयांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी थक्क झाले आहे. माझे नातेवाइक, मित्र इतकेच नव्हे तर पाकिस्तानी टीव्ही इंडस्ट्रीने आश्चर्य व्यक्त केले असल्याचे महविशने म्हटले आहे. पाकिस्तानी सीरियलमध्ये भारतीयांना काय आवडले की, त्याच्याकडून इतकी वाह वाह मिळत आहे? हा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. दुसरीकडे, इतका मोठा प्रेक्षकवर्ग मिळाल्याने पाकिस्तानी सीरियल्समध्ये काम करणार्‍या कलाकारांचेही भाव वधारले आहेत. परिणामी आता भारतीय प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन सीरियल्सचे प्लॅनिंग केले जात आहे. त्याचप्रमाणे आपल्याला भारतीय सिनेमा आणि सीरियल्सच्या ऑफर्स मिळत असल्याचे महविशने सांगितले. परंतु, महविशला अद्याप चांगल्या सिनेमाची प्रतीक्षा आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi