Publish Date: Wed, 22 Jul 2015 (11:06 IST)
Updated Date: Wed, 22 Jul 2015 (11:10 IST)
एके काळी जिरो फिगरसाठी प्रसिद्ध असलेल्या करिना कपूरचा लग्नानंतरही सिने इंडस्ट्रीत दबदबा कायम आहे. लग्नानंतरही बॉलीवूडमध्ये यशस्वी कारकीर्द करणार्या काही मोजक्या अभिनेत्रींपैकी एक ठरलेल्या करिनाने इतक्यात बाळाचं प्लॅनिंग नसल्याचं म्हटलं आहे.
‘सध्या बाळाबाबत आमचं कोणतंही प्लॅनिंग नाही. एक ना एक दिवस मी आई होईन, पण येत्या दोन-तीन वर्षात तरी आमचा कोणताही प्लॅन नाही. मी अद्याप याबाबत कुठलाही विचार केलेला नाही.’ अशी माहिती खुद्द करिना कपूरनेच दिली आहे. अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान ऑक्टोबर 2012 मध्ये विवाहबंधनात अडकले. 5 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. करिना सध्या 34 वर्षाची असून दोघांच्या वयात तब्बल 10 वर्षाचं अंतर आहे. सैफला पहिली पत्नी अमृता सिंगपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नुकताच करिना कपूर आणि सलमान खानचा बजरंगी भाईजान हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात तो तिकीटबारीवर कमाल करत आहे.