Publish Date: Fri, 14 Aug 2015 (11:45 IST)
Updated Date: Fri, 14 Aug 2015 (11:46 IST)
बॉलीवूड सिनेमांमध्ये इंटीमेट सीन्स असणे आता नित्यनेमाचे झाले आहे. अभिनेता-अभिनेत्री बिनधास्तपणे लव्ह मेकिंग सीन्स देत असतात. आगामी ‘मांझी : द माउंटेन मॅन’ या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांनी बरेच इंटीमेट सीन्स दिले आहेत. अलीकडेच हा सिनेमा टोरेंट या वेबसाइटवर लीक झाला आहे.
त्यामुळे या सिनेमात राधिका आणि नवाजुद्दीन यांनी लव्ह मेकिंग सीन्स दिल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे राधिकाने अनेकदा पडद्यावर बोल्ड सीन्स दिले आहेत. मात्र नवाजुद्दीन सिद्दीकीची ही पहिलीच वेळ होती. या दोघांनाही एकत्र लव्ह मेकिंग सीन्स करणे अवघड गेले नसल्याचे राधिकाने एका मुलाखतीत सांगितले. या दोघांवर चिखलात हा लव्ह मेकिंग सीन चित्रित करण्यात आला आहे.