अभिनेत्री कॅटरिना कैफ अणि रणबीर यांच्यातील ब्रेकअपच्या चर्चा गेली काही दिवस सतत सुरू असताना कॅटरिनाची एक मुलाखत प्रसिद्ध झाली असून त्यात कॅटरिनाने प्रेमासाठी करिअर सोडून देईन असे मत व्यक्त केले आहे.
कॅटरिनाला करिअर की प्रेम यांपैकी एकाची निवड करायची वेळ आली तर काय करशील असा प्रश्न विचारण्यात आला होता. ‘मला जर असे वाटले की माझे हृदय घरात असावे आणि मुलांना मोठे करावे तर नक्कीच मी त्यासाठी तयार असेन. प्रत्येक महिलेने स्वत:च्या मनाचे ऐकले पाहिजे.’
बार बार देखो या सिनेमात ती सिद्धार्थ मल्होत्रासमवेत काम करत आहे. यात सिद्धार्थ लग्नापासून पळत असलेला युवक दाखवण्यात आला आहे.
या अनुषंगाने पुरूष लग्नापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात का असा प्रश्नही विचारण्यात आला होता. त्यावर कॅटरिनाने हा विषय स्त्री किंवा पुरूष असा नसून वैयक्तिक स्वरुपाचा आहे, असे उत्तर दिले आहे.