Publish Date: Wed, 23 Sep 2015 (11:23 IST)
Updated Date: Wed, 23 Sep 2015 (11:27 IST)
हिंदी सिनेसृष्टीचा महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन आता ट्विटरवर खर्या अर्थाने महानायक ठरला आहे. भारतात सर्वात जास्त ट्विटर फॉलोअर्स अमिताभ बच्चन यांच्या अकाउंटला आहेत. त्यानंतर अनुक्रमे अभिनेता शाहरुख खान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता आमिर खान आणि अभिनेता सलमान खान यांचा क्रमांक लागतो.
या घडीला अमिताभ बच्चन यांच्या फॉलोअर्सची संख्या 1 कोटी 69 लाख 8 हजार 195 एवढी आहे. अमिताभ बच्चन यांनी 2010 साली ट्विटरवर अकाउंट उघडलं. ट्विटरवर दररोज अँक्टिव्ह असणारे अमिताभ बच्चन विविध विषयांवर मतही ट्विटरवरुन व्यक्त करताना दिसतात. विशेषतः: जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न अमिताभ बच्चन ट्विटरच्या माध्यमातून करताना दिसतात.
ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येत अमिताभ बच्चन यांच्यामागोमाग अनुक्रमे शाहरुख, नरेंद्र मोदी, आमिर खान आणि सलमान खान यांचा क्रमांक लागतो. शाहरुख खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जणू ट्विटर फॉलोअर्सची स्पर्धाच लागली आहे, असे वाटतं. कारण फॉलोअर्सच्या यादीत कधी शाहरुख दुसर्या क्रमांकावर असतो, तर कधी पंतप्रधान मोदी. असंच काहीचं आमिर आणि सलमान बाबत 4 आणि 5 व्या क्रमांकासाठी होतं आहे. मात्र, भारतात ट्विटरच्या स्पर्धेत बिग बी अमिताभ बच्चन यांना टक्कर देण्यासाठी कुणी जवळपासही नाही, हे मात्र निश्चित.