Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉस अक्षयकुमारने आकारली 56 कोटी रुपये फी

बॉस अक्षयकुमारने आकारली 56 कोटी रुपये फी
नंबर वन च्या शर्यतीपासून कायम लांब राहिलेला आणि आपल्या कामाशी मतलब असलेला बॉलिवूड हिरो अक्षयकुमारने चित्रपटासाठी रेकॉर्ड मानधन आकारले असल्याचे समजते. आजपर्यंत मागितलेली फी अक्षयकुमारला चित्रपट निर्माते नेहमीच देत आले आहेत. दिव्या कुमार खोसला यांनी त्यांच्या नव्या चित्रपटासाठी अक्षयकुमारशी करार केला असून त्यांना अक्षयकुमारने 56 कोटी रूपये फी सांगितली आहे.
 
सनम रे आणि यारिया या चित्रपटांचे निर्माते दिव्याकुमार यांच्या या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यापूर्वी बरे यश मिळाले आहे. आपल्या अद्यापी नाव न ठरलेल्या चित्रपटाबाबत मात्र त्यांना खूपच अपेक्षा आहेत. 
 
या चित्रपटाच्या कथेची चर्चा त्यांनी अक्षयकुमारबरोबर केली आहे. आणि अक्षयने मागितलेली फी देण्याचेही मान्य केले आहे. यापूर्वी अक्षयने जॉली एलएलबी टू साठी 42 कोटी रूपये मानधन घेतले होते व विशेष म्हणजे या चित्रपटाचे एकूण बजेट होते 62 कोटी. 
 
अक्षयच्या एअरलिफ्ट व हाऊसफुल्ल थ्री चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

#whatsapp cornerपुणेरी उखाणे...