Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठमोळा ‘आयर्नमॅन’.. मिलिंद सोमण!

milind sonam
स्वित्झर्लडमध्ये पार पडलेली ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा’ जिंकून बॉलिवूडचा अभिनेता आणि मॉडल मिलिंद सोमणनं ‘आयर्नमॅन’चा खिताब हस्तगत केलाय. 
 
19 जुलै रोजी स्वित्झर्लडच्या ज्युरिखमध्ये ही स्पर्धा पार पडली. ट्रायथलॉन जगातील सर्वात कठीण रेसपैकी एक म्हणून ओळखली जाते. यंदा या स्पर्धेत 2000 जणांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये 7 भारतीय स्पर्धकांचा समावेश होता. 
 
या स्पर्धेत 3.8 किलोमीटर स्वि¨मग (पोहणं), 180.2 किलोमीटर सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर धावणं न थांबता केवळ 16 तासांत पूर्ण करायचं होतं. मिलिंदनं हे आव्हान केवळ 15 तास 19 मिनिटांत पूर्ण केलं. छोटय़ा पडद्यावरच्या ‘कॅप्टन व्योम’ या कार्यक्रमातून मिलिंद घराघरात दाखल झाला होता. त्यानंतर, तरकीब, जुङ्र्क, जोडी ब्रेकर्स आणि एलेक्स पांडियन यांसारख्या सिनेमांतही त्यानं महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्यात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi