Publish Date: Wed, 15 Jul 2015 (09:37 IST)
Updated Date: Wed, 15 Jul 2015 (09:41 IST)
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचा बजरंगी भाईजान हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र त्याच दिवशी जाणिवा हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याचं समजताच सलमान चिंताग्रस्त झाला आणि त्याने जाणिवाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली.
जाणिवा या मराठी चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांचा पुत्र सत्या मांजरेकर मुख्य भूमिकेत आहे. एक दिवस सत्या माझ्या भेटीला आला. सर, मी एक सिनेमा केला असून तो तुमच्या बजरंगी भाईजानसोबतच प्रदर्शित होणार आहे असं सलमानला सांगतो. सत्याचा जाणिवा आणि बजरंगी. 17 जुलैलाच प्रदर्शित होत असल्याचं समजताच मी चिंताग्रस्त झालो, मी त्याला प्रदर्शनाची तारीख बदलण्याची विनंती केली असंही सलमानने सांगितलं. अखेर सत्याने त्याच्या निर्मात्यांशी बोलून त्याच्या चित्रपटाची तारीख बदलली. जाणिवा आता 31 जुलैला प्रदर्शित होईल. सत्या खूप खूप आभार, या शब्दांत सलमानने सत्या मांजरेकरचं कौतुक केलं आहे. सलमानने जाणिवा चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती.
हा चित्रपट मनापासून तयार केला आहे. त्यासाठी प्रत्येकानं आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे. एका उत्कृष्ट संकल्पनेवर सर्वोत्तम चित्रपट आहे. जाणिवाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही. अशी स्तुतिसुमनं दबंग खानने उधळली आहेत.