Publish Date: Tue, 21 Jul 2015 (10:59 IST)
Updated Date: Tue, 21 Jul 2015 (11:01 IST)
‘जिस्म 2’पासून बॉलीवूड करिअर सुरुवात केलेल्या सनी लिऑन सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. सनी लिऑन विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे मतं मांडण्यासाठीही प्रसिद्ध आहे. सनी लिऑनचं डॅनियल वेबरशी लग्न झालं आहे. नुकतंच तिला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावेळी ती म्हणाली, सध्या मला आई व्हायचं नाही. मात्र, भविष्यात याबाबत नक्की विचार करेन.
सध्या करिअरबाबत गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे आणि ही वेळ मुलांसाठी योग्यही नाही. आता कुठे मला बॉलीवूडमध्ये काम मिळायला सुरुवात झाली आहे. अद्याप अनेक सिनेमे करायचे आहेत, असेही सनी म्हणाली. याचवर्षी सनी लिऑनचे ‘एक पहेली लीला’ आणि ‘कुछ कुछ लोचा है’ हे सिनेमे प्रदर्शित झाले. शिवाय, ती सध्या ‘मस्तीजादे’ या आगामी सिनेमातही दिसणार आहे.