काल करेबिया प्रीमियर लीगमध्ये टी-20 सामन्यात ट्रिनबागो नाइट राइडर्सच्या शानदार विजयानंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने टिटरवर सुनील नारायणची मला पप्पी घ्यायची आहे तर ब्रँडन मॅक्युलम यांच्या पाठीची मसाज करू इच्छितो. शानदार विजयाबद्दल अभिनंदन, माझा दिवस हा माझ्यामुळे वाईट गेला पण तुम्ही माझी रात्र शानदार घालवली त्याबद्दल धन्यवाद! असे टिट केले आहे. दरम्यान वरील दोन्ही खेळाडू शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू आहेत.
कोलकाता नाईट राईडरच्या विजयाने शाहरूख भलताच खुश झाला आहे. संघातील ज्या खेळाडूंनी सामना जिंकण्यासाठी विशेष योगदान दिले, त्यांचे अभिनंदन करताना शाहरूखने सुनील नारायणचे आणि ब्रँडन मॅक्युलमचे खास शब्दात कौतुक करून नारायणची पप्पी तर मॅक्युलमच पाठीची मसाज करण्याची इच्छा व्यक्त केली.