हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक व निर्माते यश चोपडा यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी 'ऑफिसर डी ला लीजनं डी ऑनर' हा फ्रांसचा सवौच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यामुळे यश चोपडा यांचा लता मंगेशकर, सत्यजित रे, अमिताभ बच्चन यांच्या यादीत समावेश झाला आहे. याअगोदर यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'किंग ऑफ रोमांस' म्हणून चोपडा यांची ख्याती आहे.
जगभरातील कलाकारांना सहकार्य करण्याची फ्रांसची परंपरा आहे. चोपडा यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला कारकीर्द आणि भारतीय चित्रपटांच्या माध्यमातून जगभर सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठीच्या त्यांच्या प्रयत्नांचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान करण्यात येत असल्याचे फ्रांसचे भारतातील राजदू जेरोम बोनाफॉंट यांनी स्पष्ट केले. चोपडा यांनी 'दिवार, कभी कभी, डर, चांदणी, सिलसिला यासारखे रोमँटिक चित्रपट दिले आहेत.