Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यशराज बॅनरखाली अमिताभ आणि आमिर एकत्र?

यशराज बॅनरखाली अमिताभ आणि आमिर एकत्र?
लवकरच एका चित्रपटात बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन आणि मि.परङ्खेक्शनिस्ट आमिर खान हे दोन मोठे कलाकार एकत्र काम करताना दिसण्याची शक्यता असून अमिताभ यांच्यासोबत सलमान आणि शाहरुख या दोन्ही खान कलाकारांनी काम केले आहे. 
 
मात्र, आमिरने त्यांच्यासोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्यामुळे या दोघांच्याही चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.
 
याबाबत इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, यशराज बॅनरखाली निर्माण होत असलेल्या चित्रपटात अमिताभ आणि आमिर हे एकत्र काम करणार असून हे वृत्त या निर्मिती संस्थेने फेटाळून लावले आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन्ही प्रसिद्ध कलाकारांनी चित्रपटासाठी निर्मात्यांना होकार कळवल्याचे कळते.
 
या चित्रपटाची अधिकृत घोषणा होईपर्यंत यासंबंधीची सर्व माहिती गुप्त ठेवण्याचे आदेश निर्मात्यांनी सर्व कलाकारांना दिले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंगनाचे पुन्हा एकदा बिनधास्त वक्तव्य