Publish Date: Thu, 24 Sep 2015 (10:20 IST)
Updated Date: Thu, 24 Sep 2015 (10:23 IST)
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि किम शर्माशी डेटिंग केल्यानंतर क्रिकेटर युवराज सिंगच्या नव्या गर्लफ्रेण्डची चर्चा आहे. युवराज सिंग ब्रिटिश मॉडेल आणि बॉलीवूड अभिनेत्री हेजल किचला डेट करत असल्याचं समजतं. युवराज अनेक इव्हेंट्स आणि विविध ठिकाणी ब्रिटिश मॉडेल हेजल किचसोबत दिसत आहे.
इतकंच नाही. दोघेही एकत्र सुटीसाठी लंडनला गेले होते. 2011 मध्ये आलेल्या ‘बॉडीगार्ड’ सिनेमात हेजल किच ही सलमान खान आणि करिना कपूरसोबत दिसली होती. या सिनेमात तिने सलमानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय हेजलने अनेक आयटम साँगही केले आहेत. क्रिकेटमधील कॅसेनोव्हा अशी ओळख असणार्या युवराजच्या प्रेमप्रकरणाची सत्यता लवकरच करेल, मात्र हेजल किंवा युवीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.