Publish Date: Tue, 08 Sep 2015 (10:12 IST)
Updated Date: Tue, 08 Sep 2015 (10:15 IST)
क्रिकेटपटू युवराजसिंग आणि बॉलीवूड अभिनेत्री हेजल किच सध्या डेटिंग करत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. या दोघांनीही याबाबतीत मौन बाळगले असले तरी युवराज आणि हेजल नुकतेच लंडन येथे सुटीवर जाऊन परतले असल्याचे सांगितले जात आहे. सलमानच्या बॉडीगार्डमध्ये हेजलचे दर्शन झाले होते तसेच आंटे अमलापूरममध्ये हॉटनंबरमध्येही ती दिसली होती.
गेले काही दिवस युवराज व हेजल डेटिंग करत आहेत. आजकाल ते एकमेकांसोबत बराच काळही व्यतीत करत आहेत. आयपीएल पूर्वी युवराज बराच काळ मुंबईतच होता मात्र तेव्हा अभिनेत्री असीनसोबत त्याचे अफेअर सुरू असल्याची चर्चा होती.
युवराजसोबत बॉलीवूड अभिनेत्रींची नावे अनेकदा जोडली गेली आहेत. त्यात किम शर्मा, दीपिका पदुकोण, नेहा धुपिया यांचीही नावे होती. पंजाब इलेव्हनची सहमालक प्रीती झिंटासोबतही त्याचे नाव जोडले गेले होते मात्र प्रीतीने या बातमीचा स्पष्ट शब्दात इन्कार केला होता.