Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजकुमार हिरानी यांचा एक्सीडेंट

rajkumar hirani
मुन्नाभाई...', पीकेसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक राजू हिरानी यांना लीलावती रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बाईक चालवण्याचा प्रयत्न करताना वळणावर घसरल्यामुळे हिरानी यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
 
वांद्र्याच्या पाली हिल परिसरात राजू हिरानी बाईक चालवत होते. त्यावेळी पडल्याने मंगळवारी पहाटे 3 वाजता त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हिरानी यांच्या जबड्याला आणि डोक्याला दुखापत झाली असून मंगळवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे
 
हिरानी सध्या डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीत उपचार घेत आहेत. शस्त्रक्रियेनंतर राजू हिरानींच्या प्रकृतीबाबत डॉक्टर माहिती देतील. हिरानी दिग्दर्शित 'साला खडूस' हा चित्रपट अंतिम टप्प्यात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi