Publish Date: Tue, 17 Nov 2015 (16:45 IST)
Updated Date: Tue, 17 Nov 2015 (16:48 IST)
2016 च्या सुरुवातीला राणी मुखर्जी तिच्या पहिल्या अपत्याला जन्म देणार आहे. सूत्रांप्रमाणे सध्या राणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून तिला अशक्तपणा आणि थकवा जाणवतं होता. म्हणूनच तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
आता तिच्या आरोग्यात सुधार झाला असून डॉक्टरांनी तिला घरी जाण्याची परवानगीही दिली आहे, पण राणीच्या कौटुंबिक सदस्यांनी तिला काही दिवस रूण्लयातचं राहण्याचा सल्ला दिला आहे. 21 एप्रिल 2014 रोजी निर्माता- दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्यासह राणीने लग्न केले होते.