Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिचाचा बोल्ड अंदाज

रिचाचा बोल्ड अंदाज
यंदाच्या वर्षी उन्हाच्या झळा वाढतच आहेत. त्यामुळे थंडगार पाण्यात पडून राहावं असं प्रत्येकाला वाटत आहे. म्हणून की काय या गरम वातावरणामुळेच अभिनेत्री रिचा चढ्ढाने चक्क बिकिनीवर पाण्यात डुंबणे पसंत केले आहे. होय ही तिच रिचा आहे जी या आधी आपल्याला साडी, सूट, सलवार मध्येच दिसायची. मात्र आता बिकिनी परिधान करून स्वत:ला ‘थंड’ करताना दिसत आहे. तिच या मादक लूकची चर्चा बॉलिवूडमध्ये जोरात सुरू आहे. 
 
रिचाने नुकतेच मॅक्सिम मासिकासाठी ‘बोल्ड’ फोटो शूट केले आहे. काळी बिकिनी परिधान करून ती स्विमिंग टँकमध्ये पोहताना दिसत आहे. सर्वाना बेहोश करून टाकतील अशा मादक पोज रिचाने दिल्या आहेत. अमृतसरची असणारी रिचा चढ्ढा ही नेहमी आपल्याला ऑङ्ख बीट चित्रपटांमधून दिसत आलेली आहे. ती म्हणते ‘मी खूप मुडी आहे. मला हवे तसे ड्रेस मी परिधान करत असते. मला कोणत्याच ड्रेसचे वावडे नसून कोणी मला काही म्हणेल याची मी तमा बाळगत नाही.’

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कतरीनाला किस करायला या हीरोने दिला नकार