अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या घरी आणखी एक नवा पाहुणा आला आहे. जेनेलियाने दुसर्या मुलाला जन्म दिला आहे. रितेशने त्यांच्या छोटय़ा रिआनला भाऊ झाल्याचं ट्विट केलं. जेनेलिया दुसर्यांदा प्रेगनंट असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या. मात्र जेनेलिया सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहात असल्यामुळे, त्याला दुजोरा मिळत नव्हता. अखेर बुधवारी रितेश-जेनेलियाने दुसर्या बाळाला जन्म दिला.
यापूर्वी रितेश-जेनेलियाने 25 नोव्हेंबर 2014 रोजी रिआनला जन्म दिला होता. रितेश आणि जेनेलिया यांचा विवाह 3 फेब्रुवारी 2012 रोजी झाला. 2003 मध्ये आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाच्या सेटवर त्यांच्या अफेअरची सुरुवात झाली होती. के. विजया राव यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमातून दोघांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.