बॉलीवूडमध्ये सेक्सी फिगर म्हणून ओळख असणारी रिया सेन चांगलीच लठ्ठ झाली आहे. लठ्ठपणा वाढेल तर करीयर पाण्यात जाईल या भितीने तिने वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मुळातच रियाकडे कामाचा दुष्काळ आहे. त्यातच वजन वाढल्याने तिला काम देणा-या निर्मात्यांची झोप उडाली आहे. उरलेसुरले काम हातातून जाऊ नये, यासाठी रियाने व्यायाम सुरू केला आहे. आपले वजन लवकरच आटोक्यात येईल, असा तिला विश्वास आहे.