Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लुलिया वेंचूरसोबत गुपचूप केला साखरपुडा

सलमान खान साखरपुडा रोमानिया लुलिया वेंचूर
सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा लग्नाच्या बातम्यांनी चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे ही बातमी भारतातून नव्हे तर चक्क परदेशातून अर्थातच रोमानियातून आली आहे. 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुखारेस्ट (रोमानिया) लुलिया वेंचूरच्या पीआरने दावा केला आहे, की सुपरस्टार सलमान खानसोबत लुलियाचा साखरपुडा झाला असून पुढील वर्षी दोघे लग्नगाठीत अडकतील. 
 
रोमानियात सध्या दोघांच्या साखरपुड्याची चर्चा होत आहे. सलमानच्या सूत्रांनी मात्र ही बातमी केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. खरं तर गेल्या वर्षी अर्पिता खानच्या लग्नात लुलिया सहभागी झाली होती. त्यावेळी सलमानने तिची भेट आपल्या कुटुंबीयांशी घालून दिली होती. तेव्हासुद्धा दोघांच्या लग्नाची चर्चा झाली होती. आता या बातमीत किती तथ्य आहे, हे येणार्‍या दिवसांतच कळेल. 

सलमानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वेंचूर रोमानियाची रहिवासी असून ती मॉडेल आणि टीव्ही होस्ट आहे. 2006 मध्ये लुलियाने टीव्हीकडे वाटचाल केली. तिने झठज टीव्हीसाठी मॉर्निग शो होस्ट केला. तसेच आठवड्याचा शेवटच दिवशी मॉर्निग न्यूज अँकर होती. तसेच वर्षातील एका मोठ्या इव्हेंटची होस्टसुध्दा असायची. लुलियाने स्टीफन बनीकासोबत डान्सिंग प्रोग्रामसुध्दा केला आहे. ती स्पोर्ट्सची समर्थकसुद्धा आहे. ती लहान असताना व्हॉलीबॉल खेळत होती. तिने टेनिस, बास्केटबॉलसुद्धा खेळले आहे. तिने मागील वर्षी ‘ओ तेरी’ सिनेमात एक आयटम नंबरसुध्दा केला आहे. या सिनेमाची सलमानचा भावोजी अतुल अग्निहोत्रीने निर्मिती केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi