'दिल बोले हडिप्पा' राणी मुखर्जीसाठी महत्त्वाचा चित्रपट आहे. पण तितकाच महत्त्वाचा तो शेर्लिन चोप्रासाठीही आहे. हात धुऊन लागलेले अपयश निदान या चित्रपटाने तरी धुवून निघावे ही राणीची अपेक्षा आहे. तर शेर्लिनला दैवयोगाने मिळालेले हे बडे बॅनर फायद्याचे ठरावे असे वाटते.
शेर्लिनने सी ग्रेड चित्रपटांपासून आपला बॉलीवूडचा प्रवास सुरू केला. त्यात भरपूर अंगप्रदर्शन करूनही यश काही मिळाले नाही. तरीही तिने स्वत-ला चर्चेत मात्र ठेवले. त्यामुळे ती विस्मृतीच्या कप्प्यात काही फेकली गेली नाही. बिनधास्त राहून तिने स्वतःचे नाव तेवढे केले. अखेर त्यामुळेच की काय तिला यशराज बॅनरची फिल्म मिळाली. या चित्रपटामुळे शेर्लिनचे नशीब पालटेल असे अनेकांचे म्हणणे आहे. खुद्द शेर्लिनलाही तसेच वाटतेय. आपल्याबद्दल लोक आता गंभीरपणे विचार करतील, असे ती म्हणते.