suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सनी मेहनती आणि इमानदार: दुग्गल

Bollywood Gossip In Marathi
पॉर्न स्टार ते बॉलीवूडची बेबी डॉल असा प्रवास करणारी सनी लिऑन गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्रींशी वादामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. सेलेना जेटली, राखी सावंत अशा अभिनेत्रींसोबत सनी लिऑनचे काही वाद झाल्याचे समोर आले आहे. अशातच ‘एक पहेली लीला’मधील सहकलाकार रजनीश दुग्गल यांनी सनी लिऑनवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
 
सनी लिऑन मेहनती आणि इमानदार असल्याचं अभिनेता रजनीश दुग्गल याने म्हटलं आहे. सिनेमातील प्रत्येक सीन करताना प्रचंड मन लावून करते, असेही रजनीश दुग्गल म्हणाला. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, रजनीश दुग्गल आणि सनी लिऑन आगामी ‘बेइमान लव्ह’ या सिनेमात एकत्र काम करत आहेत. हा सिनेमाही रोमँटिक कथेवर आधारित आहे. रजनीश दुग्गल याने याच वर्षी ‘एक पहेली लीला’ या सिनेमात सनी लिऑनसोबत काम केले आहे. या सिनेमात सनी आणि रजनीशने न्यूड सीनही दिले आहेत. बॉलीवूडमधील इतर अभिनेत्रींसोबत वाद झाल्यानंतर 
 
पहिल्यांदाच सनी लिऑनच्या बाजूने बोलण्यास कुणीतरी उतरल्याचं या निमित्ताने दिसला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi