Publish Date: Mon, 17 Aug 2015 (09:58 IST)
Updated Date: Mon, 17 Aug 2015 (09:59 IST)
कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यात अडकलेल्या आणि स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चाललेल्या दिसत आहेत. आता तिच्या संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. म्हणे राधे माँ पोर्न स्टार आणि बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनची मोठी फॅन आहे. हा खुलासा 32 वर्षीय एका महिलेने केला आहे. या महिलेनेच राधे माँवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप लावला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या महिलेने उघड केले, की राधे माँ सनी लिओनची मोठी चाहती असून तिच्या गाण्यावर थिरकत असते. इतकेच नाही तर ती तिचे सर्व व्हिडिओजही बघते. या महिलेने दावा केला आहे, की तिने राधे माँला सनी लिओनच्या गाण्यावर नाचताना पाहिले आहे.
राधे माँच्या दरबारात येणार्या भक्तांना ती आलिंगन व चुंबन घेताना अनेकदा समोर आले आहे. सध्या सोशल साईटस्वर तर सध्या राधे माँचे फोटो दिसत आहेत. या फोटोंमध्ये राधे माँ तिच्या भक्तांच्या मिठीत दिसतेय.