Publish Date: Wed, 26 Aug 2015 (10:40 IST)
Updated Date: Wed, 26 Aug 2015 (10:43 IST)
सैफ अली खानची बहीण सोहा अली खाननं आपल्या आगामी चित्रपटाबाबत सांगितलंय. तिनं शूटिंग दरम्यानचे अनुभव सांगितले. सोहा अली खानचं म्हणणं आहे की, सनी देओलसोबत काम करताना ती खूप नर्व्हस होती. सोहा ‘घायल’ चित्रपटाच सिक्वेलमध्ये काम करतेय.
‘घायल वन्स अगेन’ सनी देओलचा 1990मध्ये आलेला चित्रपट घायलचा सिक्वेल आहे. घायल त्या काळातील हिट चित्रपट होता. सनीसोबत काम करण्याचे वेगवेगळे अनुभव सोहानं सांगितले. ती म्हणते, मी सुरुवातीला घाबरलेली होती. सोहा पहिल्यांदाच सनी देओलसोबत काम करतेय. सोहा म्हणते, सनी खूप मोठे स्टार आहेत. ते जास्त बोलत नाहीत. त्यामुळं त्यांच्यासोबत बोलताना भीती वाटायची. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सनी देओल खूप लाजाळू आहेत.
सोहा या चित्रपटात एका डॉक्टरच्या भूमिकेत आहे. जी सनी देओल यांच्यावर उपचार करते. त्यामुळं दोघांचे अनेक इमोशनल सिन्स आहेत. अभिनयासोबत सनी देओल चित्रपटाचे निर्माते पण आहेत. 13 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल. सलमान खानचा ‘प्रेम रतन धन पायो’ पण याच दिवशी रिलीज होईल. मात्र सनी देओलनं आपण बॉक्स ऑफिसच्या चढाओढीवर विश्वास ठेवत नसल्याचं म्हटलंय.‘