suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमान खान मामा होणार!

अर्पिता आयुष शर्मा
बॉलीवूडचा लाडका दबंग सलमान खान मामा होणार आहे. सल्लूची लाडकी बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांच्याकडे गोड बातमी असल्याची बातमी ‘इंडिन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने दिली आहे.
 
सलमानचा भाऊ, अभिनेता अरबाज खानने या वृत्ताला दुजोरा दिल्याचंही बातमीत म्हटलं आहे. ‘अर्पिता आई होणार असून आम्ही सगळे खूप आनंदात आहोत’ अशा भावना अरबाजने व्यक्त केल्या आहेत. 2016 वर्षाच्या सुरुवातीला अर्पिता-आयुषला बाळ होणार आहे. खान कुटुंबीयांनी नुकताच गणेशोत्सव साजरा केला. अर्पिताने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर त्यांच्या उत्सवाचे काही फोटो शेअर केले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अर्पिता आणि आयुषने थाटामाटात लगीनगाठ बांधली होती. हा विवाहसोहळा चार-पाच दिवस रंगला होता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi