Publish Date: Mon, 26 Oct 2015 (10:23 IST)
Updated Date: Mon, 26 Oct 2015 (10:24 IST)
दिवाळीच्या मुहूर्तावर अवघं बॉलीवुड आणि सलमानचे फँन्स प्रेम रतन धन पायो चित्रपटाची वाट पाहत आहेत. सलमाननं या चित्रपटासाठी कोणतीही फी घेतली नाहीय. सांगण्यात येतंय की, सलमान खाननं सूरज बडजात्याकडून कोणचीही फीस घेतली नाही.
कदाचित फिल्म रिलीज झाल्यानंतर चित्रपटाच्या कमाईचा काही भाग तो घेईल. रिपोर्टनुसार पहिल्याच भेटीत सलमाननं सूरज बडजात्यांना सांगितलं की, ते चित्रपटासाठी एकही रूपया घेणार नाही. मात्र चित्रपटाच्या प्रॉफिटचा काही भाग तो घेईल. मात्र प्रॉफिटमधील किती भाग सलमान घेईल हे अजून स्पष्ट झालं नाही.
12 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय. सलमान खान रोमांटिक भूमिकेत सोनम कपूर सोबत दिसणार आहे.