Publish Date: Sat, 14 Nov 2015 (09:19 IST)
Updated Date: Sat, 14 Nov 2015 (09:21 IST)
दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा ‘प्रेम रतन धन पायो’ हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा चित्रपट असून यामध्ये सलमान खान पुन्हा एकदा डबल रोलमध्ये दिसणार आहे. त्याची एक भूमिका राजकुमार ‘प्रेम’ची आहे, तर दुसरी भूमिका फायटर ‘विजय’ची आहे. सलमान पहिल्यांदाच या चित्रपटात सोनम कपूरसोबत रोमांस करताना दिसणार आहे. सोनम या चित्रपटात राजकुमारी मैथिलीच्या भूमिकेत आहे.
एक राजकुमार आणि त्याचे सावत्र भाऊ-बहिणीमधील द्वेषाभोवती चित्रपटाची पटकथा ङ्खिरते. कोणतेही नावीन्य पटकथेत नाही मात्र याचे चित्रीकरण खूपच भव्यदिव्य पध्दतीने झाले आहे. या चित्रपटाची प्रत्येक ङ्ख्रेम खूपच सुंदर आहे. लोकेशन ते कपडय़ांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये सूरज बडजात्याने खूप मेहनत घेतली आहे.
सोनम-सलमानची जोडी चांगली वाटते. ती राजकुमारीच्या भूमिकेत फीट बसते. संपूर्णपणे हा चित्रपट सलमानसाठीच बनवण्यात आला आहे हे प्रत्येक क्षणी जाणवते. प्रेमच्या भूमिकेत त्याचाही अभिनय जोरदार आहे. चित्रपटात नील नितीन मुकेश, स्वरा भास्कर, अरमान मलिक आणि अनुपम खेरसुध्दा साहाय्यक भूमिकेत दिसतात. तसेच सर्वानीच आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे.
तुम्ही जर का सलमान खानच्या प्रेम या अवताराचे फॅन असाल तर हा चित्रपट खास तुमच्यासाठीच आहे. तसेच फार दीर्घ काळानंतर एखादा फॅमिली इंटरटेनिंग चित्रपट पाहाण्याची इच्छा असेल तर हा चित्रपट तुम्हाला निराश नाही करणार.