Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमानसोबत रोमान्स करणार दीपिका!

सलमानसोबत रोमान्स करणार दीपिका!
सलमान खान ‘सुल्तान’ला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर ‘टय़ुबलाईट’ या आगामी चित्रपटाच्या कामात व्यस्त झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान असून या चित्रपटात कबीरला कॅटरिना कैफला घ्यायची इच्छा आहे. पण सलमानला दीपिका पदुकोण अभिनेत्री म्हणून हवी आहे. पण अद्याप ‘टय़ुबलाईट’ची अभिनेत्री निश्चित झालेली नाही. पण कॅटरिनाच्याऐवजी दीपिकाचीच वर्णी लागेल असेच चित्र सध्यातरी आहे. 
 
‘टय़ुबलाईट’ चित्रपटाचे शूटिंग लडाखमध्ये लवकरच सुरू होईल. 80 दिवसांचे एकूण शूटिंग असेल. कबीर खानने शूटिंगच्या लोकेशनसाठी लडाख गाठले असून त्याने ट्विटर एक फोटोही शेअर केला आहे. आम्ही इथे आहोत. 28 तारखेपासून टय़ुबलाईटचे शूटिंग सुरू होणार, असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘एक था टायगर’ या चित्रपटानंतर सलमानसोबत कबीर खानचा ‘टय़ुबलाईट’ हा तिसरा चित्रपट असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंगना साकारणार राणी लक्ष्मीबाई