Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुखबीर सिंग 17 लाख सोडून विमानतळावरून पसार

Bollywood Gossip In Marathi
प्रसिद्ध पंजाबी पॉप सिंगर सुखबीर सिंग लाहोर विमानतळ अधिकार्‍यांच्या हातावर तुरी देत पसार झाल्याची माहिती ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिली आहे. सामानामध्ये 27 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 17 लाख रुपये सापडल्यानंतर कस्टम अधिकार्‍यांनी त्याला अडवले होते. लाहोर विमानतळावर दुबईला जाणारे विमान पकडण्यासाठी सुखबीर सिंग आला होता. पीके-203 क्रमांकाचे विमान पकडण्यापूर्वी सामानाचे स्क्रीनिंग करताना अधिकार्‍यांना त्यात रोकड असल्याचे लक्षात आले. त्यामुळे सुखबीरला अधिकार्‍यांनी विमानात चढण्यास मज्जाव केला. कस्टम अधिकार्‍यांकडे चौकशीसाठी नेत असताना सुखबीरने पळ काढला. मात्र त्याचे सामान आणि 17 लाखांची रोकड त्याने तिथेच सोडली. सरवररोड पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली असून सुखबीरचा शोध सुरू आहे. 
 
2009 मध्ये सुखबीरच्या सुरक्षारक्षकांकडे हत्यार सापडल्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी विमानतळावरच थांबवले होते. सुखबीरचे भांगडा साँग्ज हिट असून ‘तेरे नाल नचना’, ‘गल बन गई’ सारखी सुपरहिट गाणी त्याच्या नावावर जमा आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi