Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुरू झाली सिंघम 3 आणि गोलमाल 4 ची तयारी

Bollywood Gossip In Marathi
हिंदी सिनेसृष्टीला आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगण यांनी दिले आहेत. या दोघांच्या जोडगोळीच्या ‘सिंघम’ आणि ‘गोलमाल’च्या सिक्वेलने बरीच धमाल उडवून दिली होती. पण आता या चित्रपटांचे पुढील भाग कधी येणार याची मोठी प्रतीक्षा प्रेक्षकांना आहे.
 
सध्या ‘सिंघम 3’ आणि ‘गोलमाल 4’ या चित्रपटांच्या पुढील भागांची तयारी जोरात सुरू असून रोहित शेट्टी याचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाच्या कथानकाचे काम प्रगतिपथावर असल्याचे अजय देवगण यांनी सांगितले. सध्या रोहित ‘दिलवाले’ चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. यात शाहरुख खान आणि काजोल खूप काळानंतर एकत्र काम करीत आहेत. त्यानंतर रोहित ‘राम लखन’चे शूटिंग सुरू करणार असल्यामुळे ‘सिंघम 3’ आणि ‘गोलमाल 4’ साठी आपल्याला 2017 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi