Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुलतानसाठी सलमानने घेतले 106 कोटी!

सुलतानसाठी सलमानने घेतले 106 कोटी!
सध्या बॉलिवूडमधील अनेक चित्रपट 100 कोटींच्या दरम्यान व्यवसाय करत असून मात्र सलमान खान हा एकाच चित्रपटात काम करण्यासाठी 100 कोटी रुपये शुल्क घेणारा बॉलिवूडमधील पहिला कलाकार बनला आहे. 
 
त्याने गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘सुलतान’ या चित्रपटासाठी 106 कोटी रुपये घेतल्याचे समोर आला आहे. या चित्रपटाचा नफा 50-50 या प्रमाणात घ्यावा अशी अट ठेवण्यात आली होती. 
 
भारतीय बाजारात सुलतानने 298 कोटींचा व्यवसाय केला आहे. लवकरच हा चित्रपट 300 कोटींचा आकडा पार करेल. हा चित्रपट तयार करण्यासाठी 70 कोटी रुपये आणि प्रिन्ट, प्रमोशनच्या 25 कोटी अशा रकमेने हा खर्च 95 कोटीपर्यंत पोहोचला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सनीला घेतल्याने सोनाक्षी नाराज!