कान फिल्म फेस्टिवलमध्ये रविवारी चित्रपट 'सरबजीत'ची स्क्रीनिंग झाली, ज्यात 42 वर्षीय ऐश्वर्या राय बच्चनने परपल लिपस्टिक लावली होती आणि कुठलीही जूलरी घातली नव्हती. ऐश्वर्याने फेस्टमध्ये रामी कादीचा फ्लावर-स्ट्रेव्न (flower-strewn) गाऊन परिधान केला होता.
कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या गोल्डन ड्रेसमध्ये अवतरतली आणि तिने अनेकांना घायाळ केले. यात तिचा पती अभिषेक बच्चनही होता. अभिषेकने तिचा ब्लॅक अँड व्हाईट लुकमधला फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करून एक फोटो हजार शब्दांचे काम करतो असा संदेश लिहिला होता. रणदीप हुंडा स्टारर हे चित्रपट 20 मे रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात ऐश्वर्या सरबजीतच्या बहीण दलबीर कौरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटांमधून ब्रेकअप घेतल्यानंतर हे तिचे दुसरे चित्रपट आहे. या अगोदर तिचे 'जज्बा' रिलीज झाले होते जे फ्लॉप झाले.
महत्त्वाचे म्हणजे ऐश्वर्या आणि कान फिल्म फेस्टिवलचे नाते 15 वर्ष जुने आहे. रविवारी कान फेस्टमध्ये ऐश्वर्याच्या लुकला बघून ट्विटरवर लोक जोरदार कमेंट्स करत आहे. कोणी म्हणत आहे की ऐश्वर्याने एक नवीन फॅशन ट्रेडचा परिचय दिला आहे, तर कोणी म्हणत होते की ऐश्वर्याला बघून असे वाटत होते की रेड कारपेटवर येण्याअगोदर तिने बर्याच जांभळाचे सेवन केले असेल.