Publish Date: Thu, 29 Oct 2015 (17:09 IST)
Updated Date: Thu, 29 Oct 2015 (17:27 IST)
क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि अभिनेत्री गीता बसरा यांचा विवाह संपन्न झाला आहे. त्यापूर्वी काल मेंदी समारंभ पार पडला. गीता आणि हरभजन यांनी आपला मेंदी सोहळा खूप एंजॉय केल्याचं फोटोंवरून दिसतंय. सोशल मीडियावर मेंदी समारंभाचे काही फोर्टो शेअर करण्यात आलेत. यात गीतानं गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा लहेंगा-चोली ड्रेस घातला. त्यात की खूप सुंदर दिसतेय.
या समारंभानंतर चूडा सेरेमनीसाठी गीतासाठी कास ऑरेंज रंगाचा लाचा घालणार आहे. तर रिसेप्शनमध्ये गीता निळ्या रंगाच्या लहेंग्यात दिसेल. लग्नसमारंभ पाच दिवस चालेल. यात संगीत, मेंदी, फेरे, रिसेप्शनसारके समारंभ आहेत. रिसेप्शन दिल्लीत 1 नोव्हेंबरला आहे. रिसेप्शनला क्रिकेट, बॉलिवूड आणि बिझनेस क्षेत्रातील अनेक मान्यवर असतील. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, प्रियंका चोप्रा, अक्षयकुमार, हृतिक रोशन, राहुल गांधी, नीता आणि मुकेश अंबानी सहभागी असतील. असं कळतंय.