Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हरियाणाचा मुलगा आहे 'द जंगल बुक'चा मोगली

हरियाणाचा मुलगा आहे 'द जंगल बुक'चा मोगली
, मंगळवार, 26 एप्रिल 2016 (15:51 IST)
अमेरिकेत तयार झालेले चित्रपट 'द जंगल बुक'मध्ये आपल्या धमाकेदार अभिनयाने संपूर्ण जगात धमाल करत असलेला कलाकार नील सेठी मुलात: हरियाणाच्या सिरसा जिल्ह्याच्या डबवाली शहराचा आहे.  
नील वर्तमानात भले अमेरिकेचा नागरिक आहे, पण त्याचे संबंध सिरसा जिल्ह्याच्या डबवालीशी आहे. नीलचे आजोबा डॉ. रामजीदास सेठीचा जन्म येथेच झाला आहे. किमान 45 वर्षांपासून अमेरिकेत जाऊन वसणारे डॉ. रामजीदास आता ही प्रत्येक वर्षी डबवाली येतात. येथे त्यांचे  पैतृक घर आहे. नील देखील लहानपणी डबवाली येऊन गेला आहे.  
 
13 वर्षीय नीलने चित्रपटात मोगलीची भूमिका साकारून बॉलीवूडच्या मोठं मोठ्या हसत्यांपासून सामान्य प्रेक्षकांना आपला दिवाना बनवला आहे. आतापर्यंत ह्या चित्रपटाने सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यापार केला आहे. नीलचे वडील डॉ. सैम आणि आई डॉ. रत्ना सेठी अमेरिकेत दंत सर्जन आहे.   
 
22 डिसेंबर 2003मध्ये अमेरिकेत जन्म घेणारा नील सध्या सहाव्या कक्षेचा विद्यार्थी आहे. जंगल बुकचे दिग्दर्शक जॉन फेवरू यांनी नीलला शाळेच्या एका नाटकात अभिनय करताना बघितले तर तेव्हा ते नीलच्या अभिनयाच्या विलक्षण प्रतिभेशी फारच प्रभावित झाले आणि त्याला आपल्या चित्रपटात लीड रोलमध्ये घेणे आणि 30 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव त्याच्या आई वडिलांसमोर ठेवला आणि ते त्यासाठी लगेचच तयार ही झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बघा 'हाऊसफुल 3'चे ट्रेलर