Publish Date: Mon, 31 Aug 2015 (09:45 IST)
Updated Date: Mon, 31 Aug 2015 (09:48 IST)
‘आशिकी’ चित्रपटातील ‘धिरे धिरे से..’ गाण्याच्या रिमेकसाठी सध्या हृतिक रोशन आणि सोनम कपूर चर्चेत आहेत. गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान दोघांनीही खूप धमालमस्ती केल्याचे, तसेच दोघांचे एकमेकांशी चांगले सूर जुळत असल्याचे ऐकिवात आहे.
आपल्या बडबड्या स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या सोनमने हृतिकबरोबरचा नृत्यानुभव खूप छान असल्याचे शेअर केले आहे. शूटिंग संपल्यावर एक दिवस हृतिकने अचानकपणे सोनमसोबत नृत्य करण्यास सुरुवात करून तिला आश्चर्यचकित केले. दोघे टँगो प्रकारातील नृत्य सादर करत असताना उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.