बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान गरोदर असून ती या वर्षाखेर आपल्या बाळाला जन्म देईल. त्यामुळे सैफ अली खान सध्या खूपच खूश आहे. त्याने आपल्या होणार्या बाळाचे नावही ठरवले आहे. आपल्या बाळाच्या जन्माविषयी अनेक गोष्टींचा खुलासा करिनाने एका मुलाखतीमध्ये केला.
करिना म्हणाली, हा अनुभव माझ्यासाठी खूप खास आहे. मी सातत्याने काम करत आहे. चित्रपटांसोबतच मी वेगवेगळ्या इव्हेन्टस्मध्येही सहभागी होत आहे. गर्भावस्थेत करिना आपल्या कपडय़ांकडे विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमात जाताना करिना तिचा मित्र मनीष मल्होत्राने डिझाईन केलेले मॅटर्निटी स्टाईल कपडे घालणे पसंत करते.
करिनाच्या गर्भधारणेबद्दल सैफच्या प्रतिक्रियेबद्दल सांगताना करिनाने सांगितले, सैफ मला म्हणाला तू गर्भावस्थेतच चांगली वाटतेस. बाळाच्या नावाबद्दल बोलताना करिना म्हणाली, सैफला ‘सैफिना’ नाव आवडते. त्यामुळे तो होणार्या बाळाचे नाव ‘सैफिना’ ठेवणार आहे.