Publish Date: Mon, 16 Nov 2015 (10:31 IST)
Updated Date: Mon, 16 Nov 2015 (10:32 IST)
टीम इंडियामधून सध्या बाहेर असलेला स्टार क्रिकेटर युवराज सिंगचा ब्रिटिश मॉडेल-अभिनेत्री हेझल क्रीचशी बालीमध्ये साखरपुडा झाला. युवराज-हेझलच्या लग्नानंतर युवीचे नशीब बदलेल आणि तो क्रिकेट संघात पुनरागमन करेल, असा विश्वास पिता योगराज यांनी व्यक्त केला आहे. ‘युवराजने हेझलशी माझी ओळख करून दिली, तेव्हाच ती चांगली मुलगी असल्याचे माझ्या ध्यानात आले. लग्नानंतर युवीचे भाग्य पालटेल आणि तो टीम इंडियामध्ये पुन्हा स्थान मिळवण्यात यशस्वी होईल. भारताचे प्रतिनिधित्व करण्याची ताकद युवराजमध्ये आहे’ असे योगराज यांना वाटते. युवराजच्या अपयशासाठी धोनीवर तोफ डागणार्या योगराज यांनी हेझलला सून म्हणून स्वीकारले आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघे विवाहबद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युवराज रणजी ट्रॉफी खेळून टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याची आशा व्यक्त केली जात आहे.