rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘कट्टीबट्टी’

Bollywood Gossip In Marathi
, बुधवार, 13 ऑगस्ट 2014 (16:40 IST)
निर्देशक निखिल अडवाणींच बेस्ट लव्हस्टोरीवर आधारित ‘कट्टीबट्टी’या चित्रपटात अभिनेत्री कंगना राणावतसोबत इमरान खान दिसणार आहे. कंगना असं म्हणाली की इतर चित्रपटात बॉलिवूडच पारंपरिक लव्हस्टोरीपेक्षा हा चित्रपट अत्यंत वेगळ्या पद्धतीने हाताळला गेला आहे. येता सप्टेंबरमध्ये ‘कट्टीबट्टी’ची शूटिंग सुरू होणार आहे. खूप दिवसांपासून कंगना राणावतच्या प्रोजेक्टची चर्चा सुरू होती. आता ‘कट्टीबट्टी’ या चित्रपटाद्वारे ती लोकांसमोर येणार आहे. या चित्रपटातून एक नॉटी लव्हस्टोरी लोकांसमोर येणार आहे आणि इमरान खान या चित्रपटात मुख्य
अभिनेता म्हणून काम करणार आहे. आतापर्यंत कंगना आणि इमरानची एकत्र जोडी कधीच कोणत्या चित्रपटात पाहाला मिळाली नाही आणि आता ‘कट्टीबट्टी’या चित्रपटात ते दोघे एकत्र पाहायला मिळणार आहेत. सगळे त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण हे दोघे एकत्र पडद्यावर दिसणार हे कळल्यानंतर बर्‍याच चर्चा सुरू झाल आहेत. या चर्चेतून असं म्हटलं जात आहे की यांची एक युनिक जोडी तार होईल. कंगनाला ‘क्वीन’ या चित्रपटात बरेच यश प्राप्त झाल्यानंतर तिचा ‘रिव्हॉल्वर रानी’ हा चित्रपट रिलीज झाला आणि त चित्रपटाला साधारण प्रतिसाद मिळाला होता. आता पाहू या ‘कट्टीबट्टी’ला कसा का प्रतिसाद मिळतो ते!

Share this Story:

Follow Webdunia marathi