90 च्या दशकातील बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या गाजलेल्या ‘जुडवा’ चित्रपटाचा सिक्वेल बनणार आहे.
वरुण धवन ‘जुडवा 2’ मध्ये मुख्य भूमिका करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही ‘जुडवा’ बनवलेले डेव्हीड धवन करतील. यात छोटय़ा भूमिकेत सलमानही झळकेल.
साजिद नाडियाडवाला ‘जुडवा 2’ची निर्मिती करणार आहेत. यात पाहुणा कलाकार म्हणून काम करण्याची इच्छा सलमान खानने व्यक्त केली आहे.
साजिद यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘किक’या चित्रपटात सलमानने काम केले होते. दोघात मैत्रीचेही चांगले नाते आहे. ‘जुडवा 2’ ची कथा तयार आहे. पण सलमानची चित्रपटात काम करायची इच्छा असल्यामुळे कथेत बदल करण्यात येणार असल्याचे समजते.