Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘तेरे नाम’चा सिक्वेल येणार

Bollywood Gossip In Marathi
2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘तेरे नाम’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा लवकरच सिक्वेल येणार असून ‘तेरे नाम’चे दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी सिक्वेल बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 
सतीश कौशिक यांनी या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचे नक्की केले आहे. पण या चित्रपटात सलमान खान असेल की नाही, याबाबत सतीश कौशिक याबाबत स्पष्ट केले नाही. तेरे नाम या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची इच्छा आहे आणि बनवल्यास मलाच खूप आनंद होईल. फेसबुक आणि ट्विटरवरुन अनेकजण मला तेरे नामचा सिक्वेल बनवण्याबाबत विचारणा करतात. मात्र, सिक्वेलला कधी मुहूर्त मिळेल, याबाबत मी आताच काहीही सांगू शकत नाही. शिवाय, सलमान खान आता सुपरस्टारहून मोठा कलाकार झाल्यामुळे तो या तेरे नामच्या सिक्वेलसाठी तयार होईल की नाही, याबाबत काहीही खात्रीलायक सांगू शकत नाही, असे दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi