Publish Date: Thu, 01 Oct 2015 (10:55 IST)
Updated Date: Thu, 01 Oct 2015 (11:04 IST)
सलमान खानच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. सलमानने त्याचा आगामी सिनेमा ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं आहे. सल्लूने ट्विटरवर सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. सलमानने ट्विटरवर लिहिलं आहे की, इस दीवाली प्रेम इज बॅक. सलमानने अशा 15 सिनेमात काम केलं आहे ज्यात त्याचं नाव ‘प्रेम’ आहे.
सूरज बडजात्या यांनी ‘प्रेम रतन धन पायो’चं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाचं पोस्टर अतिशय शानदार आहे. यात सलमान खान निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये आणि पांढर्या धोतीमध्ये दिसत आहे. सलमानने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, गूड आफ्टरनून, सूरज बडजात्याच्या प्रेमचं पुन्हा स्वागत करताना सूरज बडजात्या आणि सलमान खान ही अँवॉर्ड विनिंग जोडी 16 वर्षानी पुन्हा एकत्र आली आहे. याआधी सलमानने सूरज बडजात्याच्या ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘हम साथ-साथ है’ यांसारख्या हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेमाचा ऑफिशिअल ट्रेलर आज 1 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.
चित्रपटात सलमानसोबत सोनम कपूर मुख्य भूमिकेत आहे. हे दोघे याआधी ‘सावरियाँ’मध्ये दिसले होते. ‘प्रेम रतन धन पायो’ येत्या 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.