Publish Date: Mon, 12 Oct 2015 (10:10 IST)
Updated Date: Mon, 12 Oct 2015 (10:12 IST)
‘मैं सनी लिऑन बनना चाहती हूँ’, असं कुठली मुलगी बोलत नाही. तर हे आहे एका हिंदी सिनेमाचं नाव. हा सिनेमा बॉलीवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिऑनच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.
याआधी 2008 मध्ये ‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ हा अंतरा माळीचा सिनेमा आला होता. अंतरा माळीने एका छोट्या गावातून अभिनेत्री बनण्यासाठी आलेल्या तरुणीची भूमिका निभावली होती. मुंबईमध्ये येऊन माधुरी दीक्षितसारखी अभिनेत्री बनण्याचं स्वप्नं घेऊन ती आलेली असते. मात्र, या वाटचालीदरम्यान येणार्या अडचणी या सिनेमातून मांडल्या आहेत. या सिनेमाप्रमाणेच ‘मैं सनी लिऑन बनना चाहती हूँ’ हा सिनेमा येत आहे. बॉलीवूड अभिनेत्री सनी लिऑनवर आधारित हा सिनेमा असल्याचं बोललं जात आहे.
सनी लिऑन प्रमाणे पॉर्न स्टार बनण्याचं स्वप्न बाळगणार्या एका तरुणीची कथा या सिनेमातून मांडली जाणार असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमात सनी लिऑनच्या भूमिकेत नवी अभिनेत्री असणार आहे, तर कांती शाह हा सिनेमा तयार करत आहेत.
लो-बजेट सिनेमे बनवणारे निर्माते म्हणून कांती शाह यांची ओळख आहे. सनी लिऑनने या सिनेमाबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सनी लिऑनचा पती डॅनियल या सिनेमाबाबत नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या सिनेमावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.