Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘मोहेंजोदारो’ अडचणीत?

hritik roshan
बॉलिवूडमधील सुपरस्टारचे अवाच्या सव्वा मानधन हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. गेल्या वर्षी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची ‘मोहेंजोदारो’ची घोषणा केली.
 
या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी हृतिक रोशनचे नाव निश्चित झाले तेही 50 कोटी रुपये मानधन देण्याच्या शर्तीवर. तेव्हाच खरे म्हणजे बॉलिवूडजनांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. 
 
या चित्रपटामुळे हृतिक रोशन हा सर्वाधिक मानधन घेणारा बॉलिवूडमधील कलाकार ठरणार आहे असेही बोलले जाते. मात्र सध्या तरी त्याच्या या अवाच्या सव्वा मानधनामुळे गोवारीकर यांचा चित्रपट चांगलाच अडचणीत आला आहे. ºख्रिस्तपूर्व 2600 काळातील सिंधू संस्कृतीचा शोध हा ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटाचा विषय आहे. त्यामुळे व्हीएफएक्स हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असणार हे निश्चित होते. चित्रीकरणासाठीचे लोकेशन्स, विविध तंत्रज्ञांची घ्यावी लागणारी मदत हे सगळे गणित लक्षात घेता चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले. हा चित्रपट आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शन्स आणि डिस्ने यूटीव्ही यांची एकत्र निर्मिती आहे. मात्र एवढे सगळे असूनही हृतिकचे 50 कोटी रुपये दिल्यानंतर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर चांगलेच अडचणीत येणार आहेत. हृतिकला 50 कोटी रुपये देणार की नाही, याबद्दल अजूनही कोणी सांगितलेले नसले तरी खुद्द हृतिकने हे वृत्त नाकारले नव्हते.

Share this Story:

Follow Webdunia marathi