Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘सनीबाई’ लियॉन सादर करणार लावणी

सनीबाई लावणी
सनी लियॉन लावणी सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सनी चक्क प्रेक्षकांवर लावणीची छाप टाकणार आहे. सनी लियॉन मराठी चित्रपटासाठी अप्रोच झाली होती, ती पण ‘शाळा’चा दिग्दर्शक सुजय डहाके याच्या ‘वल्गर अँक्टिव्हिटीज इंकॉर्प’ या चित्रपटासाठी. पण त्याच्या पुढे काही विशेष घडले नाही. आता चित्रपट नाही पण मराठीच्या इव्हेंटच्या माध्यमातून का होईना तिची इच्छा पूर्ण होणार आहे.

इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल अँवॉर्ड्स इम्फाच्या व्यासपीठावर तिची पावले थिरकणार आहेत. एखादी लावणी आणि मराठी गाण्यावर सनी लियॉनला पाहणे ही खरंच एक पर्वणी ठरणार आहे. एखाद्या मराठी पुरस्कार सोहळ्यात नृत्य करण्याची सनीची पहिलीच वेळ आहे. या वर्षी 
 
महोत्सवाची थीम ही ‘मराठी इन बॉलीवूड’ अशी आहे. सेक्सी अदाकारी आणि सादरीकरणासाठी सनी लियॉन फेमस आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi